रोहित शर्माची वनडेतील धडाकेबाज कामगिरी! 8 कर्णधारांच्या नेतृत्वात 'हिटमॅन'ने गाजवलं मैदान!
भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत 8 वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले आहे. रोहितने एकूण 282 वनडे सामन्यांत 48.85 च्या सरासरीने 11,577 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 33 शतके आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी, रोहित शर्माने वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात केलेली कामगिरी सविस्तर दिलेली आहे.
महेंद्रसिंग धोनी: धोनीच्या (M.S. Dhoni) नेतृत्वाखाली रोहितने 121 सामने खेळले, ज्यात 35.70 च्या सरासरीने 3,678 धावा केल्या. यात 7 शतके आणि 21 अर्धशतके असून, 209 धावा ही त्याची या काळातील सर्वोच्च खेळी होती.
विराट कोहली: कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहितने 80 सामन्यांत 61.34 च्या प्रभावी सरासरीने 4,110 धावा केल्या. यात 18 शतके आणि 14 अर्धशतके असून, त्याची 264 धावांची ऐतिहासिक खेळी याच काळात झाली.
रोहित शर्मा (स्वतःच्या नेतृत्वाखाली): स्वतः कर्णधार असताना रोहितने 56 सामने खेळले आहेत. यात त्याने 52.20 च्या सरासरीने 2,506 धावा केल्या असून 5 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 208 धावा ही त्याची या काळातील सर्वोत्तम खेळी आहे.
सुरेश रैना: रैनाच्या नेतृत्वाखाली रोहितने 9 सामने खेळले, ज्यात त्याने 103.40 च्या सरासरीने 517 धावा केल्या. यात 2 शतके आणि 3 अर्धशतके असून, 114 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
शुबमन गिल: शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली रोहितने 6 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 52.60 च्या सरासरीने 263 धावा केल्या आहेत (1 शतक आणि 1 अर्धशतक). नाबाद 121 धावा ही त्याची यातील सर्वोत्तम खेळी आहे.
वीरेंद्र सेहवाग: सेहवागच्या नेतृत्वाखाली रोहितने 4 सामने खेळले, ज्यात 94.66 च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतके असून 95 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
के. एल. राहुल: के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली रोहितने 3 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 48.67 च्या सरासरीने 146 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतके असून, 75 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
Comments are closed.