ENG vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची नवीन टीम जाहीर! बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन बाहेर
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर केला आहे. 17 जूनपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
इंग्लंडचा विद्यमान कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes & Gus Atkinson) आणि पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन यांना संघातून वगळण्यात आले आहे. लॉर्ड्स कसोटी 7 जून रोजी संपल्यानंतर, त्या रात्री चेल्सीमधील एका नाईट क्लबमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी ईसीबी (ECB) चौकशी करत आहे. ही घटना टीम शिस्त आणि कर्फ्यू (वेळेचे बंधन) मोडल्यामुळे घडल्याचे ईसीबीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतरच स्टोक्सच्या भविष्यातील करिअरबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
दुसऱ्या कसोटीसाठी अनुभवी खेळाडू जो रूट (Joe Root) याच्याकडे हंगामी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रूटने 2017 ते 2024 या काळात 64 कसोटी सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व केले आहे. तसेच, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि जॉर्डन कॉक्स यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. जोफ्रा आर्चर 11 जूनला इंग्लंडला परतत असून, एशेज मालिकेच्या दीर्घ कालावधीनंतर तो कसोटी संघात परतला आहे. मात्र, त्याचे कामाचे ताण (workload) पाहता तो या सामन्यात खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
न्यूझीलंडविरुद्ध ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:
जो रूट (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स रियू, ऑली रॉबिन्सन, जेमी स्मिथ (कर्णधार) आणि जोश टंग.
Comments are closed.