महागाईविरोधात शिवसेनेचा मुलुंडमध्ये मोर्चा
जीवघेणी महागाई, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाट दरवाढीमुळे आज सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. गोरगरीबांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सरकारविरोधात शिवसेनेकडून मुलुंडमध्ये आज जोरदार मोर्चा काढण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले. इंधनाची दरवाढ रद्द करा, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात विधानसभाप्रमुख पुरुषोत्तम दळवी, नंदिनी सावंत, उपविभागप्रमुख दिनेश जाधव, नितीन चवरे, सीताराम खांडेकर, हेमलता सुकाळे, कविता शिर्के, शीला सोनावणे, विभागसंघटक रूपेश गुजर, सागर देवरे, शाखाप्रमुख अमोल संसारे, संजय जाधव, स्वप्नील सूर्यवंशी, शैलेश पवार, संजय जाधव, स्वप्नील गायकवाड, महिला शाखासंघटक यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले.
Comments are closed.