Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर… 

Thane Assault Case : ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय कॅब चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अखेर 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुजोर कॅब चालकाचे नाव निशांत धर शुक्ला असं आहे. मारहाण झालेले वयोवृद्ध दाम्पत्य प्रचंड घाबरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे स्वतःहून पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनून पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल केला आहे.

जयंत पाटलांना त्यांच्या घरी कोणी विचारत नाही म्हटलं तर चालेल का? जयकुमार गोरेंचा पलटवार 

सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांनी दोन्ही राजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार (Jaykumar Gore on Jayant Patil) केला. जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असे म्हटले तर कसे चालेल का? अशा शब्दात गोरे यांनी टोलेबाजी केली. सांगली सातारा विधान परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे. आम्ही सगळ्यांनी ती स्वीकारली आहे असे गोरे म्हणाले.

Comments are closed.