Share Market News – आखातात युद्ध पेटले; शेअर बाजार रिकव्हरी मोडवर?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक अशांतता आणि अमेरिका-इराणमध्ये पुन्हा पेटलेले युद्ध यामुळे जागतिक शेअर बाजार तणावात आहेत. अशा अस्थिरतेच्या परिस्थितीत गुंतवणूकदारही संभ्रमात आहे. त्यातच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारात मोठी घसरण दिसत आहे. आखातात तणाव वाढल्यानंतर हिंदुस्थानी बाजार घसरणीसह सुरू झाला. मात्र, दुपारच्या सत्रात बाजार रिकव्हरी करताना दिसत आहे. तसेच सोनेचांदीच्या दरातही किरकोळ वाढ दिसत आहे.

आखाती देशात पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे गुगुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे.

आखाती देशातील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई सेन्सेक्स सकाळच्या सत्रात ४०० हून अधिक अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० निर्देशांक २३,१०० अंकांच्या खाली गेला. मागील सत्रात सेन्सेक्स ७३,९८३.१८ वर बंद झाला होता आणि गुरुवारी सकाळी ९:२१ वाजता, तो ७३,६९३.८० वर व्यवहार करत होता, २८९.३८ अंकांनी किंवा ०.३९% ने घसरला होता. निफ्टी ७५.३० अंकांनी किंवा ०.३२% ने घसरून २३,१०४.६५ वर व्यवहार करत होता. रुपया डॉलरच्या तुलनेत ३५ पैशांनी घसरून ९५.६० वर उघडला.

सकाळच्या सत्रातील दुपराच्या सत्रात बाजारात रिकव्हरी दिसून आली. दुपारी 12.30 सुमारास निफ्टी आणि सेन्सेक्स वधरताना दिसत होते. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 116.50 अंकांच्या म्हणजेच 0.16% टक्क्यांच्या वाढीसह 74,073.95 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 27.15 अंकांच्या म्हणजेच 0.12% वाढीसह 23,235.05 वर व्यवहार करत होता.

अमेरिकेने इराणच्या अनेक लक्ष्यांना लक्ष्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की, इराणला वाटाघाटींसाठी बराच वेळ देण्यात आला होता, पण आता त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. दरम्यान, आज कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड सध्या १.७२ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९४.७२ डॉलरवर व्यवहार करत आहे, तर डब्ल्यूटीआय क्रूड २ टक्क्यांनी वाढून ९१.८२ डॉलरवर आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावार दिसत आहे.

Comments are closed.