Gen Z, मिलेनियल्स की आणखी कोणी? भारतात कर्ज घेण्यात कोण आघाडीवर? रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
भारतातील सर्वात मोठे कर्जदार नवी दिल्ली: भारतात डिजीटलयाझेशनमुळं कर्ज घेणं सोप झालं आहे. कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात सर्वाधिक कर्ज कोणत्या वयोगटातील लोक घेतात, यासंदर्भातील रिपोर्ट समोर आला आहे. त्या रिपोर्टमध्ये Gen-Z, मिलेनियल्स आणि 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे अशी विभागणी करण्यात आली आहे.
मिलेनियल्स आघाडीवर
रिपोर्टनुसार मिलेनियल्स ज्यांना म्हटलं जाते ते म्हणजे 29 ते 44 वयोगटातील लोकांनी सर्वाधिक कर्ज घेतल्याचं समोर आलं आहे. एकूण कर्जात त्यांची आकडेवारी अधिक आहे. याचं कारण घर खरेदी, वाहन खरेदी आणि व्यवसाय सुरु करणे आणि कुटुंबाच्या वाढत्या गरजा हे आहे.
Gen Z कर्ज घेण्यातही अग्रेसर
रिपोर्टमध्ये एक समोर आलं की Gen Z (18 ते 28 वर्ष) वयोगटातील युवकांमध्ये देखील कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, ते मिलेनियल्सच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. मात्र, नव्या कर्जदारांमध्ये त्यांची संख्या वाढत आहे. विशेष बाब म्हणजे Gen Z मध्ये पर्सनल लोन, ग्राहक लोन आणि बाय नाऊ पे लॅटर सारख्या सुविधा लोकप्रिय होत आहे.
दरम्यान, 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार केल्यास त्यांच्यात कर्ज घेण्याचा वेग कमी आहे. वयाच्या या टप्प्यावर लोकांनी आर्थिक ध्येय गाठलेलं असतं. त्यासाठी त्याचं कर्जावरील अवलंबित्व कमी झालेले असते.
कोणत्या प्रकारच्या कर्जांचं प्रमाण वाढलं?
गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, कंझ्युमर ड्यूरेबल कर्ज या प्रकारच्या कर्जांचं प्रमाण वाढलं आहे.
चिंता का वाढली?
तज्ज्ञांच्या मतानुसार आर्थिक क्षमता पाहून हिशोबानं आणि विचारपूर्वक घेतलेलं कर्ज चुकीचं नाही. मात्र, उत्पन्नापेक्षा अधिक कर्ज घेणं आर्थिक संकट निर्माण करु शकतं. युवकांनी EMI आणि क्रेडिट स्कोअरमध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे.
रिपोर्टनुसार भारतात कर्ज घेण्याचं चित्र मोठ्या प्रमाणात बदल आहे. मिलेनियल्स सर्वाधिक कर्जदार आहेत. त्यांच्यानंतर GenZ मध्ये कर्जाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळं येत्या काही वर्षांमध्ये तरुण देशातील क्रेडिट बाजाराला प्रभावित करु शकतात.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.