दिल्लीनंतर पुण्यात एकवटली कॉक्रोच पार्टी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम; केल्या या 5 मागण्या
पुणे : दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीने गुरुवारी (11 जून) संध्याकाळी पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थी आणि तरुणांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन केले. नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ठाम मागणी करताना आंदोलकांनी सरकारवर तीव्र टीका केली. आंदोलनात लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाषणे केली.
सोनम वांगचुक म्हणाले, देशात ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हटले जाते, पण शिक्षण क्षेत्रात मोठा अंधार दिसत आहे. परीक्षांमध्ये घोटाळे होत असतील तर विद्यार्थी कुठे जाणार? शिक्षण आणि पर्यावरण हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. सत्य आणि अहिंसा हा माझा मार्ग आहे, न्याय हे माझे ध्येय आहे. त्यांनी पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकले जात असल्याचे सांगितले आणि सरकारने जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले.
अभिजीत दीपके यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांना या सिस्टममुळे आत्महत्या करावी लागली आहे. तरीही हे लोक खुर्चीला चिटकून बसले आहेत. विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला असताना जबाबदारी कोण घेणार? पंतप्रधान मोदींना विचारायचे आहे की, तुमच्यासाठी विद्यार्थी महत्त्वाचे की तुमचा मंत्री? दीपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि शनिवारपर्यंत राजीनामा न झाल्यास 20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ठाम मागणी करताना आंदोलकांनी सरकारवर तीव्र टीका केली.
पेपर लीक झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला 10 हजार रुपये भरपाई द्यायला हवी, तसेच 72 तासांत बॅकअप परीक्षा घ्यावी. पेपर हाताने तपासण्यात यावे, तसेच उशिरा होणार्या परीक्षांत वयोमर्यादा शिथिलता देण्यात यावी. तर, परीक्षेच्या 7 दिवस आधी कॉम्युटर टेस्टचे ऑडिट झाले पाहिजे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
Comments are closed.