FIFA World Cup 2026 – इंग्लंडपासून सावध राहा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विश्वचषकाच्या रणांगणात उतरण्यापूर्वी इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टय़ुशेल यांनी अपेक्षांवर जरा थंड पाणी टाकले असले तरी त्यांच्या वक्तव्यातून प्रतिस्पर्ध्यांसाठी एक धोक्याची घंटा स्पष्ट ऐकू येत आहे. सहा दशकांपासून विश्वचषक जिंकता न आलेल्या इंग्लंडला सर्वात मोठा दावेदार म्हणण्यास टय़ुशेल यांनी नकार दिला आहे. ‘अनेक संघांनी यापूर्वी विश्वचषक जिंकला आहे आणि त्यांचा इतिहास आमच्यापेक्षा अधिक यशस्वी आहे.’ मात्र आम्ही स्पर्धक आहोत, आव्हान देणारे आहोत आणि अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याची आमची इच्छा आहे. इंग्लंड दावेदार नसला तरी त्याच्या संघातील गुणवत्ता, अनुभव आणि स्टार पाहता प्रतिस्पर्ध्यांनी हा ‘थ्री लायन्स’चा इशारा गांभीर्याने घ्यायलाच हवा, असे संकेत टय़ुशेल यांनी दिले.

Comments are closed.