FIFA World Cup 2026 – …तर सामना थांबवू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विश्वचषकाचा चेंडू अजून मैदानात फिरलेलाही नाही, पण वादांचे वादळ आधीच उठू लागले आहे. इराणचे क्रीडामंत्री अहमद दुन्यामाली यांनी फिफाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले आहे की, इराणच्या सामन्यांदरम्यान अधिकृत मान्यता नसलेले झेंडे दाखवले गेले किंवा राष्ट्रीय संघाविरोधात घोषणा दिल्या गेल्या तर सामना थांबवण्याची वेळ येऊ शकते. ग्रुप-जीमध्ये असलेल्या इराणचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध, त्यानंतर बेल्जियम आणि अखेरीस इजिप्तविरुद्ध होणार आहे. या सामन्यांपूर्वीच इराणी अधिकाऱयांनी फिफाकडे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. एप्रिलमध्ये व्हॅनकुव्हर येथे फिफा काँग्रेसदरम्यान काही आंदोलकांनी इराणला विश्वचषकातून बाहेर काढण्याची मागणी केली होती.

Comments are closed.