अफगाणिस्तानमध्ये मानवतेला काळीमा! बुरख्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर गोळीबार; लहान बालकासह दोन ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अफगाणिस्तानमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बुरख्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर तालिबानने गोळीबार केला. यात एका लहान बालकासह दोघांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. महिलांनी बुरखा घालण्यासाठी तालिबानी लढवय्यांनी आता रक्तपाताचा मार्ग अवलंबला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बुरखा घालण्यासाठी दबाव वाढवण्याकरिता तालिबानने महिलांना अटक करण्यास सुरुवात केली. या अटकेविरोधात महिला रस्त्यावर उतरल्या. तालिबानने या आंदोलक महिलांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करत गोळीबार केला. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत.

एएफपीच्या (AFP) वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या एका गटाने पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात शहरात महिलांवरील कारवाईचा निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेरातमधील तालिबानी नैतिकता पोलिसांनी शनिवारी संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा न घातल्याच्या आरोपाखाली डझनभर अफगाण महिलांना अटक करण्यास सुरुवात केली.

किमान दोन जण ठार आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ड्रेस कोड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महिलांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहेत. ही मनमानी आणि बेकायदेशीर अटक असू शकते. महिलांना त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि लैंगिक भेदभावापासून मुक्ततेच्या हक्काचा वापर केल्याबद्दल शिक्षा दिली जात असल्याचे दिसून येते, असे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने (UNHRC) नियुक्त केलेल्या 10 स्वतंत्र तज्ज्ञांनी गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

Comments are closed.