Monsoon And Konkan : पावसाळी ट्रिपसाठी कोकणातील निसर्गरम्य ठिकाणे
पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य काही औरच असते. येथे पावसात हिरवेगार निसर्गसौंदर्य, धबधबे, शांत समुद्रकिनारे, खळाळणारे धबधबे आणि उधाणलेला समुद्र पर्यटकांना भुरळ पाडतात.. मान्सूनमध्ये कोकणात वन-डे ट्रिप किंवा वीकेंडसाठी प्लॅन करत असाल, तर सर्वोत्तम ठिकाणे पाहूयात.
मारळेश्वर
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले मारळेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात निसर्गाचा चमत्कार दाखवते. येथे तुम्ही नयनरम्य दृष्ये पाहू शकता. आकर्षण म्हणजे कड्यावरून कोसळणारा धबधबा. महादेवाचे येथे असलेले मंदिरही तुम्ही पाहू शकता.
हेही वाचा – Monsoon Tourism: पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील बेस्ट ऑफ-बीट ठिकाणे
हरिहरेश्वर
उधाणलेला समुद्र पाहण्यासाठी तुम्ही हरिहरेश्वरला जाऊ शकता. या ठिकाणाला दक्षिण काशी देखीर म्हणतात. येथील मंदिराच्या पाषाणावर आदळणाऱ्या लाटा पाहणे हा अनुभव तुम्ही नक्की घेऊ शकता.
आंबोली
कोकणची चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे हे थंड हवेचे ठिकाण पावसाळ्यात धुक्याने आणि अनेक लहान-मोठ्या धबधब्यांनी वेढलेले असते. पावसाळ्यात फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
गणपतीपुळे
शांत समुद्रकिनारा आणि पावसाळी वातावरण काय असते हे पाहण्यासाठी गणपतीपुळे उत्तम पर्याय आहे.
मुरूड जंजिरा
पावसाळ्यात समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि समुद्राच्या मधोमध असलेला अभेद्य किल्ला पाहणे इतिहासाप्रेमींसाठी पर्वणी असते. तुम्ही पावसाळ्यात मुरुज जंजिऱ्याला जाऊ शकता.
टीप – पावसाळ्यात फिरताना घाटांमधील रस्ते आणि समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेची काळजी नक्की घ्या. विशेषतः धबधब्यांच्या ठिकाणी पाण्याचा अंदाज घेऊनच उतर. पावसाळी पिकनिकचा आनंद घेताना स्वत:सह, कुटूंबाची काळजी नक्की घ्या.
हेही वाचा – Monsoon Trekking: पहिल्या पावसात करा गडकिल्ल्यांचा प्रवास; वीकेंडसाठी 5 बेस्ट ऑप्शन्स
Comments are closed.