Latur News – उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटीचा भीषण अपघात, बस उलटल्याने अनेक प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लातूर जिल्ह्यातील उदगीर-अहमदपूर मार्गावर शुक्रवारी एसटीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

उदगीर तालुक्यातील मौजे सुकणी गावाजवळ उदगीर अहमदपूर मार्गावरील एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून गंभीर जखमींना उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरुंद पर्यायी रस्त्यामुळे हा अपघात झाला असून समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना एसटी बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर काढण्यात आले.

Comments are closed.