Ratnagiri News – धामणीत एसटी बसला गव्याची धडक; प्रवासी सुखरूप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे पहाटेच्या सुमारास गव्याने एसटी बसला धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र एसटी चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

यासंदर्भांत अधिक वृत्त असे की, गुरुवार ११ जून रोजी पुणे येथून रत्नागिरीकडे प्रवास करणाऱ्या एसटी बसला पहाटे ५ च्या सुमारास धामणी पेट्रोलपंपाजवळ एक गवा अचानक रस्त्यावर धावत येऊन दुसऱ्या दिशेला जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचदरम्यान चालकच्या नजरेत गवा आल्याने त्यांनी लगेच गाडीच्या वेगाला आवर घातल्याचे प्रवासी प्रशांत जाधव यांनी सांगितले. या अपघातापूर्वी कोयनानगर जवळ गाडीचा डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये ड्रायव्हर कंडक्टर यांसोबत अन्य प्रवासींनी कमालीची मेहनत घेतल्याचे देखील प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.दरम्यान गव्याची धडक बसल्याने गाडीच्या डाव्याबाजूची हेडलाईट पूर्णतः फुटल्याने गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे .मात्र चालकाच्या प्रसंगावधनामुळे जिवितहानी टळल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

Comments are closed.