खतांसाठी सातबारा मागितल्यास विक्रेत्यांवर कारवाई – दत्तात्रय भरणे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात सध्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे; परंतु भविष्यात युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम खतपुरवठय़ावर होऊ शकतो, खते खरेदी करताना कुठल्याही प्रकारे शेतकऱयांना सातबारा उतारा देण्याची गरज नाही. मात्र, जर विक्रेत्यांकडून शेतकऱयांना सातबारा उतारा मागितला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

खतांचा साठा, वितरण आणि संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे
अॅप सुरू करण्यात आले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिह्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱयांकडे स्मार्टफोन नसणे, काही भागांत मोबाइल नेटवर्कची समस्या असणे आणि अॅपमधील काही तांत्रिक त्रुटी यामुळे व्यवहार करताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भरणे म्हणाले.

Comments are closed.