विमान अपघाताचा तपास पूर्णत्वाकडे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. घटनेचे अन्वेषण करण्यात येत असून ते पूर्णत्वाकडे जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तपासात विमान अपघात तपास कक्षाने मोठी प्रगती केली असून लवकरच तपासाचा अंतिम अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एक वर्षापूर्वी झालेल्या या अपघातात विमानातील 241 प्रवासी आणि भूमीवरचे 19 नागरीक प्राणांना मुकले होते. केवळ एकाच विमान प्रवाशाचा जीव आश्चर्यकारकरित्या वाचला होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन उ•ण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच विमानात तांत्रिक दोष उत्पन्न होऊन ते कोसळले होते. भारताच्या विमान अपघातांमध्ये हा सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक मानला जात आहे. अपघातानंतर त्वरित त्याच्या चौकशीचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार विमान अपघात अन्वेषण कक्षाकडून ती केली जात आहेत. घटनेच्या कारणांचा अंतरिम अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, अंतिम अहवालासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, अशी शक्यता आहे.

Comments are closed.