पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी रविवारी पश्चिम आणि हार्बर या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात संबंधित मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटीवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलच्या दिशेने जाणाऱया डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा, तसेच सीएसएमटीवरून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 दरम्यान वांद्रे / गोरेगावच्या दिशेने जाणाऱया डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.

Comments are closed.