मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्वाची बैठक, विधानपरिषद निवडणुकीबाबत काय ठरणार?
सातारा : सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलंच आपलं असून बैठकींचा धडाका सध्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. काल भाजपची बैठक कराडला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली होती. यानंतर लगेच आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक साताऱ्यातील एका हॉटेल मध्ये पार पडतेय. मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे.
राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक
सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात महायुतीकडे संख्याबळ अधिक असलं तरी महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य साताऱ्यातील बैठकीला उपस्थित आहेत. मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. यामुळे या बैठकीमध्ये नक्की चर्चा काय होतीये आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. भाजपकडे सर्वाधिक मतदान या मतदारसंघात आहे. मात्र, भाजपला या निवडणुकीत विजय मिळवायचा असल्यास शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतांची आवश्यकता आहे. या मतदारसंघातील निकाल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भूमिकेवर ठरणार आहे.
सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महायुतीची काल एक बैठक पार पडली होती. या महायुतीच्या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील काल उपस्थित राहिले नव्हते. त्या बैठकीनंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुती मध्ये कसलेही मतभेद नाहीत.शंभूराज देसाई मकरंद आबा यांच्या बरोबर चर्चा होऊन सगळे झाले आहे, असं म्हटलं होतं. ते पुढे म्हणाले की, रविंद्र चव्हाण यांनी शंभूराज देसाई,मकरंद आबा यांच्याशी चर्चा करून आजच्या बैठकीचे नियोजन केले. कराडमधील बैठक ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलावली होती. यावर शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षाशी चर्चा झाली आहे. कोणतीही अडचण येणार नाही. भाजपच्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीने मतदान होईल. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा यांच्याशी चर्चा झालेली आहे. आमच्यामध्ये समन्वय आहे . विधान परिषदेच्या निवडणुकीला एक दिलानच सामोरे जाणार आहोत आणि एक दिलानेच मतदान होणार आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Comments are closed.