Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. त काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. दरम्यान, जे पाच खासदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित तेच पाच खासदार आज उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला देखील अनुपस्थित होते. प्रत्यक्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त चार खासदार हे मातोश्रीवर बैठकीला उपस्थित होते. आज विविध कारणं देणारे पाच खासदार काल सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले ते खासदार आज सुद्धा बैठकीला अनुपस्थित होते. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना त्यामुळे या पाच खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून आणि प्रमुख नेत्यांपासून दुरावा कायम ठेवण्याचा विचार केला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी आपण का आला नाहीत? याचे स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित राहिल्या खासदारांना दिल्या आहेत. पाच खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्षात मीटिंग दरम्यान फक्त नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी उद्धव ठाकरेंचं बोलणं झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे इतर खासदाराने आपण का उपस्थित राहू शकलो नाहीत? याचे स्पष्टीकरण दिलं आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काही खासदारांना बोलावलं असल्याची माहिती आहे. हे खासदार मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? की ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंसोबतचा दुरावा कायम राहणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे पाच खासदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित होते तेच पाच खासदार आज खासदारांच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित राहिल्यामुळं चर्चांना उधाण आले आहे.
Comments are closed.