चालकाचा हलगर्जीपणा जीवावर बेतला! रेल्वे आणि बसच्या भीषण अपघातात 2 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

झिम्बाब्वेमधील ट्रँगल या दक्षिण भागातील एका साखर उत्पादक शहरात भीषण अपघात झाला असून या अपघात 2 लहान मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघात इतर 25 जण जखमी झाले आहेत.

स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने या वृत्ता दुजोरा दिला आहे. नॅशनल रेल्वे ऑफ झिम्बाब्वेचे प्रवक्ते अँड्र्यू कानाम्बुरा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला आहे. रेल्वे ट्रॅक ओलंडण्यापूर्वी त्याने गाडी येत आहे का नाही ही तपासले नाही, ज्यामुळे अपघात झाला. रेल्वे फटाकावर बस आली असता भरधाव वेगात येणाऱ्या मालगाडीने बसला जोरदार धडकी दिली. या भीषण अपघातात दोन मुलांनासह 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 25 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

झिम्बाब्वेमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. येथील रस्ते सुरक्षा संस्थेच्या आकडेवारीनुसार, देशात दर 15 मिनिटाला एक अपघात होतो, ज्यामध्ये रोज सरासरी 5 लोकांचा मृत्यू होतो आणि 38 जण जखमी होतात. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच मध्य झिम्बाब्वेमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसला आग लागून 7 मुलांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा बसचा भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Comments are closed.