अभिनेत्री संचिताच्या आत्महत्येचे गूढ कायम
टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येचे गूढ अद्यापी उकलले नाही. मात्र आपल्या मुलीवर पैशांसाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे ती छळ सहन करत होती. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आपले आयुष्य संपवले असा आरोप संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांनी केला आहे. दरम्यान आज शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्या करून 48 तासांचा कालावधी उलटला तरीही अद्यापी तिने टोकाचे पाऊल का उचलले या तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.
Comments are closed.