एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरच

ऑपरेशन टायगर UBT शिवसेना: गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चेत असलेले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या काही तासांपासून दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ची (Opeartion Tiger) अंमलबजावणी सुरु असून बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे पाच किंवा सहा खासदार (Shivsena MPs) लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर करतील. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी 5- 6 खासदार फुटल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश संख्याबळाच्या अटीची पूर्तता होत असल्याने हे  खासदार स्वतंत्र गट स्थापन करु शकतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या खासदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे यांचे सत्तेत असणे आणि त्यांनी दिलेली आश्वासनं वरचढ ठरल्यामुळे ठाकरे गटाचे सहा खासदार अखेर शिंदे गटात जाण्यास राजी झाल्याचे समजते. (Maharashtra Politics News)

सूत्रांच्या माहितीनुसार,  एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाच्या खासदारांना अनेक मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. यापैकी खासदार संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आणि मतदारसंघातील विकासकामांसाठी मुबलक निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना त्यांच्या मतदरासंघातील प्रकल्प मार्गी लावण्याचे आणि विकासकामांसाठी मुबलक निधीचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर एका खासदाराला त्याच्या भावाचे बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण बाहेर काढून त्याला शिंदे गटात प्रवेश करायला भाग पाडल्याची माहिती आहे. तर दोन खासदारांना आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आपल्याला भविष्य उरलेले नाही, असे वाटल्याने हे दोन्ही खासदार शिंदेंसोबत जायला राजी झाल्याची माहिती आहे. या सगळ्यांना आगामी काळात मुबलक निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या सर्व सहा खासदारांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला निवडून आणेन, असा शब्द दिल्याने हे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार झाल्याचे समजते.

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

आणखी वाचा

Operation Tiger UBT Shivsena: आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?

Comments are closed.