Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
2022 मध्ये शिवसेनेमध्ये पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर राज्य आणि देशभरात एक नाव प्रामुख्याने चर्चेत आलं होतंय. हे नाव होतं अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचं… आधी शिंदेंच्या गोटात गेलेल्या नितीन देशमुखांनी नाट्यमयरीत्या गुहावटीवरून शिंदेंच्या कंपूतून परतत ठाकरेंवर आपली निष्ठा व्यक्त केली होतीय. सध्याच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी ‘एबीपी माझा’च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी केलीये. पक्षातील खासदार आणि आमदारांच्या मताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करू नये अशी खळबळजनक मागणी त्यांनी केलीये. आमदार खासदारांच्या मर्जीने झालेले हेच पदाधिकारी पुढे आमदार खासदारांच्या फुटीच्या वेळी पक्ष सोडून जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीये. ‘एबीपी माझा’च्या माध्यमातून सध्याच्या या पद्धतीवर खंत व्यक्त करणाऱ्या नितीन देशमुख यांनी लवकरच या संदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं म्हटलंय. पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदारासोबत इतर पक्षात गेले नाही तर त्यांची पक्ष सोडण्याची हिंमत होणार नसल्याचं नितीन देशमुख म्हणालेत.
दरम्यान, पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत असं परखड मत आमदार देशमुखांनी व्यक्त केलंय. निवडून आलेले आमदार खासदार हे काही मोदी आणि भाजपच्या बळावर निवडून आलेले नाहीत. ते सर्व उद्धव ठाकरेंचा फोटो वापरून निवडून आल्याची आठवण त्यांनी फुटू पाहणाऱ्या आमदार आणि खासदारांना करून दिलीय. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’ हे फक्त माध्यमातूनच सुरू असल्याचं ते म्हणालेय. ठाकरेंच्या शिवसेनेचा कोणताही आमदार आणि खासदार फुटणार नसल्याचं ते म्हणालेत. आपल्याला गुहाटी वरून परत आल्याची आयुष्यात कधीही खंत वाटत नसला तर ते म्हणालेत उलट आपल्याला आपल्या त्या कृतीचा अभिमानच वाटत असल्यास आमदार देशमुख म्हणालेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात चुकून शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला गेला तर याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदेच राहणार असल्याचं ते म्हणालेय. आणि यातून निर्माण होणारा मराठी माणसांचा जनक्षोभ एकनाथ शिंदेंना सहन करावा लागेल असं ते म्हणालेय. आमदार नितीन देशमुखांशी ‘एक्सक्लूझिव्ह’ संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी…
Comments are closed.