IND vs AFG – जिगरी मित्रांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई; दोघांचीही खणखणीत शतके, टीम इंडिया 400 पार
लखनऊमध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 402 धावांचा डोंगर उभा करत अफगाणिस्तानला 403 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. कर्णधार शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन या जिगरी मित्रांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत शानदार शतके झळकावली. जयस्वाल स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या गिलने अवघ्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत आपल्या इराद्यांची चुणूक दाखवली. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने पॉवरप्लेमध्येच संघाला 80 धावांपर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर शानदार षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. टी-20 विश्वचषक आणि आयपीएल हंगामातील चमकदार कामगिरीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या किशनने सुरुवातीला खेळपट्टीवर सेट होऊन अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने गिअर बदलत अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंवर चौफेर हल्ला चढवला. अवघ्या 51 चेंडूंवर 50 धावा करणाऱ्या इशानने पुढच्या केवळ 22 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. डिसेंबर 2022 मधील बांगलादेशविरुद्धच्या ऐतिहासिक द्विशतकानंतरचे हे त्याचे पहिलेच एकदिवसीय शतक ठरले.
इनिंग ब्रेक!
4️⃣0️⃣2️⃣ शतकवीर शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीवर आहेत 💪
आमची गोलंदाजी खेळी येत आहे! ⌛️
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/T5rJ0qHsqy
— BCCI (@BCCI) १७ जून २०२६
दुसऱ्या बाजूला, शुभमन गिलने बिलाल सामीच्या चेंडूवर चौकार मारत एकदिवसीय कारकिर्दीतील नववे आणि हिंदुस्थानी संघाचा कर्णधार म्हणून पहिलेवहिले शतक साजरे केले. या सामन्यात हिंदुस्थानी फलंदाजांनी एकाच डावात 80 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत दोन शतके झळकावण्याचा अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला. गिल आणि किशन यांच्यातील 224 धावांच्या धडाकेबाज भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने सर्वबाद 402 धावा उभारल्या आणि अफगाणिस्तानसमोर 403 धावांचे तगडे आव्हान ठेवले. धर्मशाला येथील पहिला सामना जिंकल्यानंतर हिंदुस्थानने आता या सामन्यातही मजबूत पकड मिळवून मालिका विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
Comments are closed.