सिडकोचे एमडी अश्विन मुद्गल यांनी पदभार स्वीकारला
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून अश्विन मुद्गल यांनी आज पदभार स्वीकारला. याप्रसंगी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्कालीन एमडी विजय सिंघल यांची बदली झाल्यानंतर शासनाने या पदावर अश्विन मुद्गल यांची नियुक्ती मंगळवारी केली. त्यानुसार आज दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला.
अश्विन मुद्गल हे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी, पंढरपूर-सोलापूरचे उपजिल्हाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर महापालिकेचे आयुक्त आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांनी सिडकोमध्येही सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी संभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात विमानतळाच्या कामाला गती मिळाली होती.
Comments are closed.