मीच खरा ‘शक्तीमान’! हिटलर, नेपोलियनपेक्षा मी जास्त प्रभावशाली; ट्रम्प यांनी स्वतःचेच केले गुणगान
अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचे ढोल पिटायला सुरवात केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दावा केला की, इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून त्यांची शक्ती अमर्याद झाली आहे. तेच खरे शक्तीमान झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, ते इतिहासातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. जर मी नसतो, तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते, असा दावाही त्यांनी केला.
एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, जर मी नसतो, तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत, पण आपल्याला नेतान्याहू यांना संयम ठेवण्याची आणि शांत राहण्याची गरज आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की इस्रायलला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि ते जे काही सांगतील ते इस्रायल करेल.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान यांच्या ‘रेजिम चेंज’ या पुस्तकातील काही माहिती दाखवली. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, अटिला द हून, चंगेज खान, नेपोलियन, स्टॅलिन, माओ आणि हिटलर यांच्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प अधिक शक्तिशाली आणि प्रभावशाली आहेत. ट्रम्प यांनी इतिहासातील काही सर्वात शक्तिशाली व्यक्तींची नावे घेतली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यापुढे ते प्रत्येक जण कसे फिके पडले, हे त्यात नमूद आहे. आपण सर्वशक्तीमान असूनही एक शक्ती अजूनही त्यांच्या मार्गात अडथळा आणत आहे, ती म्हणजे अर्थव्यवस्था असल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले.
Comments are closed.