केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी, पीएफच्या 8. 25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज दराला मंजुरी दिली आहे. यामुळं 7 कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीटीआयनं सूत्रांच्या आधारे याबाबत वृत्त दिलं आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून निश्चित करण्यात आलेल्या 8.25 टक्के व्याज दराला मंजुरी देण्यात आली आहे. ईपीएफओकडून सरकारकडून व्याज दराला मंजुरी मिळाल्यानंतर खातेदारांच्या खात्यात व्याज जमा केलं जातं.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून 2 मार्च 2026 ला आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याजाला मंजुरी दिली होती. यानंतर व्याज दराचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली होती. त्यानंतर प्रस्ताव वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला होता.
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
सूत्रांच्या माहितीनुसार वित्त मंत्रालयाकडून 8.25 टक्के व्याज दराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार ईपीएफओकडून याच महिन्यात 2025-26 या आर्थिक वर्षातील व्याजाची रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाऊ शकते. ईपीएफओकडून विकसित करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानानुसार व्याज थेट खातेदारांच्या खात्यात जमा केलं जाईल.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25 टक्के व्याज दर कायम ठेवलं होतं.ईपीएफओनं 2024 मध्ये देखील 2023-24 साठी व्याज दर वाढवून 8.25 टक्के केला होता. त्यापूर्वी 2022-23 मध्ये व्याज दर 8.15 टक्के होतं. मार्च 2022 मध्ये ईपीएफओनं 2021-22 मध्ये व्याज दरात कपात करुन 8.10 टक्के व्याज दिलं होतं. जे गेल्या 4 दशकातील सर्वात कमी व्याज दर होतं.
दरम्यान, पीएफ खात्यात व्याज दराची रक्कम याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ईपीएफओच्या पोर्टलवर लॉगीन करावं लागेल. याशिवाय मिस्ड कॉलद्वारे देखील शिल्लक तपासता येते.
ईपीएफओकडून 2020-21 मध्ये 8.5 टक्के व्याज दिलं होतं.आर्थिक वर्ष 1977-78 मध्ये व्याज दर 8 टक्के होतं. मार्च 2020 मध्ये ईपीएफओ ने 2019-20 मध्ये भविष्य निर्वाह निधीमधील जमा असलेल्या व्याज दरात कपात करुन ते 8.5 टक्के निश्चित करण्यात आलं होतं. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के व्याज होतं. तर 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याज दिलं होतं. 2015-16 मध्ये व्याजाचा दर 8.8 टक्के होता. 2013-14 आणि 2014-15 मध्ये व्याजाचा दर 8.75 टक्के होता. 2012-13 मध्ये 8.5 टक्के व्याज दर होता. त्यापूर्वी 2011-12 मध्ये व्याज दर 8.25 टक्के होता.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.