गिफ्ट्सपेक्षा द्या ‘क्वालिटी टाईम’; यंदाचा फादर्स डे बाबांसाठी बनवा खास!

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येतो. वडील, बाबा, पप्पा, पॉप्स.. मुलांच्या आयुष्यातील सुपरहिरो. याच बाबाविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी हा दिवस असतो. यंदाच्या फादर्स डे ला तुम्ही नेहमीच्या धावपळीतून वेळ काढून बाबासोबत काही भन्नाट विकेंड ऍक्टिव्हिटिज करू शकता.

  • बाबांशी गप्पा मारताना त्यांच्या लहानपणीचा किस्सा, अनुभव बाबांकडून जाणून घेऊ शकता. बाबांना त्यांच्या शाळेचे दिवस, त्यांचे मित्र आणि त्यांच्या काळातील खेळांबद्दल बोलते करा. यामुळे बाबांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

हेही वाचा – बदलत्या काळासोबत बदलला बाबा; यंदा ‘फादर्स डे’ला तुमच्या ‘कूल डॅड’ला द्या हे भन्नाट गिफ्ट्स

  • रविवार असल्याने आईला किचनमध्ये सुट्टी देऊन बाबा आणि तूम्ही मिळून एखादी नवीन डिश बनवू शकता. साधी वाटणारी ही गोष्ट खूप मोठा आनंद देऊन जाणारी आहे.
  • जर बाबांना खेळाची आवड असेल तर घरातच कॅरम, चेस किंवा लुडोसारखे इनडोअर गेम्स खेळता येतील.
  • संध्याकाळी बाबांच्या आवडीचा एखादा जुना क्लासिक चित्रपट किंवा एखादा स्पोर्ट्स सामना एकत्र पॉपकॉर्न खात पाहता येईल.
  • रविवारी सकाळी लवकर उठून बाबाला घेऊन बागेत ट्रेकिंग किंवा वॉकसाठी जाऊ शकता. इथे निसर्गाच्या सानिध्यात मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

हेही वाचा – पुरुषांनी 50शीनंतर त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करावे हे स्किनकेअर रुटीन

Comments are closed.