हाय प्रोटीन असलेले शाकाहारी पदार्थ

सुदृढ आरोग्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, स्नायू मजबुत होण्यासाठी शरीराला प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनांची गरज असते. मांसाहार करणाऱ्यांना अंडी, चिकन, मासे यातून प्रोटीन्स मिळतात. पण शाकाहारींना मात्र प्रोटीन्सचे स्त्रोत मर्यादीत असतात. अशावेळी शाकाहारी व्यक्तींसाठी हाय प्रोटीन शाकाहारी पदार्थ कोणते आहेत ते बघूया.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, ताक, पनीर आणि ग्रीक योगर्ट हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

डाळी आणि कडधान्ये
मूग, मसूर, तूर, हरभरा, राजमा आणि चवळी यामध्ये भरपूर प्रथिने असतात.

सोयाबीन आणि सोया उत्पादने
सोयाबीन, टोफू, सोया चंक्स आणि सोया दूध हे उच्च प्रथिनयुक्त पदार्थ आहेत.

सुकामेवा आणि बिया
बदाम, शेंगदाणे, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, चिया बिया आणि फ्लॅक्ससीड्समध्ये प्रथिनांसोबत चांगले फॅट्सही असतात.

धान्ये
ओट्स, क्विनोआ, रागी आणि इतर संपूर्ण धान्यांमध्येही प्रथिने आढळतात.

अंकुरित कडधान्ये
मोड आलेले मूग, मटकी आणि हरभरा हे प्रथिनांनी समृद्ध आणि पचायला सोपे असतात.

बेसन आणि शेंगदाणे
बेसनाचे पदार्थ, शेंगदाण्याची चटणी किंवा भाजलेले शेंगदाणे हे प्रथिनांची मात्रा वाढवण्यासाठी चांगले पर्याय आहेत.
तसेच फक्त ठराविकच पदार्थावर अवलंबून न राहता डाळी, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा आणि धान्ये यांचा संतुलित आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक प्रथिने सहज मिळू शकतात.

Comments are closed.