प्रेसिडंट ट्रम्प, नीट लक्षात ठेवा… इटली आणि मी कधीच कुणाची याचना करत नाही! जॉर्जिया मेलोनी भडकल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी फोटोसाठी माझ्या मागे लागल्या होत्या, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘इटली आणि मी कधीच कुणाची याचना करत नाही हे ट्रम्प यांनी लक्षात ठेवावे,’ असे त्यांनी ठणकावले आहे.

जी-7 राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने अलीकडेच मेलोनी आणि ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली. या भेटीबद्दल बोलताना ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे काही वक्तव्ये केली. मेलोनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी मागे लागल्या होत्या. माझी विनवणी करत होत्या, असे ट्रम्प म्हणाले. मेलोनी यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट करून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्ये निराधार आहेत. त्यांची ती बडबड ऐकून मला धक्काच बसला. ट्रम्प हे आपल्याच मित्र राष्ट्रांशी असे का वागतात हेच कळत नाही. हे असे पहिल्यांदाच घडलेले नाही, असा संताप मेलोनी यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचा मोदींना टोला

जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांना दिलेल्या सडेतोड उत्तराचा दाखला देत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला हाणला आहे. ‘नरेंद्र मोदी यांना इंदिरा गांधी यांच्याकडून काहीही शिकायचे नाही. त्यांचा अहंकार आडवा येतो. किमान मेलोनींकडून तरी त्यांनी शिकावे. मेलोडी चॉकलेट वाटत फिरता ना, मग डोळ्यात डोळे घालून ठणकावून उत्तर कसे दिले जाते हेही त्यांच्याकडून शिका,’ असा टोला काँग्रेसचे प्रवत्ते खासदार पवन खेरा यांनी मोदींना हाणला.

‘पाश्चात्य देशांच्या शत्रूंशी किंवा अमेरिकेच्या शत्रूंशी बोलताना ट्रम्प असं धाडस दाखवत नाहीत. काही देशांच्या नेत्यांपुढं ते कायम जुळवून घ्यायच्या भूमिकेत दिसतात. ही शरमेची गोष्ट आहे.’

Comments are closed.