हुश्श..! अखेर वरुणराजा बरसला, हलक्या ते मध्यम सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
मुंबईसह संपूर्ण राज्याला चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनचे आगमन झाले आहे. रविवारी सकाळी मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी पहाटेपासून मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली. मुंबईतील वरळी, घाटकोपर, लोअर परळ, चेंबूर, मानखुर्द भागामध्ये सकाळी सहा ते सात या तासाभरामध्ये सरासरी 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांची मात्र तारांबळ उडाली.
बातमी अपडेट होत आहे…
अखेर प्रतिक्षा संपली असून मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईतील अनेक भागामध्ये वरुणराजाने हजेरी लावली आहे. रविवारी पहाटेपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. pic.twitter.com/10qZp5G1lC
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 21 जून 2026
Comments are closed.