इंधन दरात कपात होण्याची शक्यता नाकारली.
पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडली सरकारची भूमिका
वृत्तसंस्था/ सोनभद्र
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधन दर कपातीची शक्यता फेटाळून लावत माध्यमांमधील चर्चेला पूर्णविराम दिला. केंद्र सरकारची नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची कोणतीही योजना नाही, असे त्यांनी नमूद केले. भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती जगातील अनेक देशांपेक्षा आधीच कमी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी लोधी येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमेरिका-इराण यांच्यातील शांतता करारानंतर युद्धस्थिती थांबली असून आता होर्मुझ सामुद्रधुतीतून होणारी कच्च्या तेल आणि वायूची वाहतूक पूर्ववत होऊ लागली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दरही उतरले आहेत. भारतासह बऱ्याच देशांना आता इंधन पुरवठा सुरू झाल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र, तूर्तास तरी इंधनदरात कोणतीही कपात होणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.