समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना जोर आला असून, ती लवकरच आई होणार असल्याचा दावा केला जात आहे. समांथाने तिच्या ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाच्या यशानिमित्त टीमसोबत छोटेखानी सेलिब्रेशन केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये समांथा जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसत असून, तिचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा अनेक चाहत्यांकडून केला जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, समांथा आणि दिग्दर्शक राज निदीमोरू लवकरच त्यांच्या आयुष्यातील या आनंदाच्या बातमीची अधिकृत घोषणा करू शकतात. मात्र, याबाबत अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. समांथा आणि राज निदिमोरू यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी साध्या पद्धतीने विवाह केल्याची माहिती समोर आली होती. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहाने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. विशेष म्हणजे, समांथा आणि राज यांनी यापूर्वी द फॅमिली मॅन आणि सिटाडेल: हनी बनी या प्रकल्पांमध्ये एकत्र काम केले आहे. आता समांथा गरोदर असल्याच्या चर्चांमुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत या बातमीकडे केवळ चर्चेच्या स्वरूपातच पाहणे योग्य ठरेल.
Comments are closed.