वटपौर्णिमेला साडीवर शोभून दिसतील हे पारंपरिक मराठमोळे दागिने

वटपौर्णिमेच्या दिवशी साडी नेसून पारंपरिक दागिने घालून वडाची पूजा करणे अनेक महिलांना आवडतं. यासाठी खूप आधीपासूनच तयारी केली जाते. वटपौर्णिमेला जर तुम्ही पारंपरिक नऊवारी किंवा काठापदराची साडी नेसणार असाल तर त्यावर मराठी दागिन्यांचा साज हा हवाच. या दागिन्यांमुळे साडीचा लूक पूर्ण होतो. चला जाणून घेऊयात पारंपरिक मराठमोळे दागिने..

कोल्हापूरी साज गळ्यात असेल तर तुम्हाला इतर दागिन्यांची गरज नाही. साडीवर घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
कोल्हापूरी साज नको असल्यास सोन्याच्या गोल नाण्यांची ज्यावर लक्ष्मी किंवा इतर देवींचे चित्र असते अशी माळ तुम्ही घालू शकता. ज्याला पुतळीहार असेल देखील म्हणतात.
मोहनमाळ तीन ते चार पदरी असते. तुम्ही गळ्यात फक्त छोटं मंगळसूत्र घालून मोहनमाळ घालू शकता.
मराठमोळ्या नथीशिवाय नऊवारीचा साज पूर्ण होत नाही. हल्ली नथींचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही आवडीनुसार निवडू शकता.
साडीवर हातात पाटल्या नक्की घाला.
पाटल्याशिवाय हिरव्या बांगड्यासोबत एक एक तोडे सुद्धा घालता येतील.
कानात कुड्या घाला. मोत्याच्या किंवा सोन्याच्या घालू शकता. तुम्ही बुगडी सुद्धा घालू शकता.

हेही वाचा – वटपौर्णिमेला मराठमोळ्या लूकला द्या ‘मॉडर्न टच’; फॉलो करा या फॅशन टिप्स

Comments are closed.