टीएमसीच्या माजी आमदारावर अंडी फेकली
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या हुगळी जिह्यात माजी टीएमसी आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांच्याविरोधात जनतेचा संताप स्पष्टपणे दिसून आला. गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस ठाण्यात आणताच बाहेर जमलेल्या लोकांनी ‘चोर, चोर’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान काहींनी तर त्यांच्यावर अंडीही फेकली. तारकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांना पोलिसांनी कर्नाटकातून अटक करून ट्रान्झिट रिमांडवर हुगळी येथे नेले होते. सरकारी मदत साहित्य चोरल्याचा आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना शस्त्रांनी धमकावल्याचा आरोप माजी आमदारावर आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर टीएमसी नेत्यांविरोधातील आंदोलनाची ही सहावी घटना आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून टीएमसी नेत्यांना सार्वजनिक विरोधाचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक नेत्यांना अटकही करण्यात आली आहे.
Comments are closed.