‘मैं वापस आऊंगा चित्रपटाने जिकंली प्रेक्षकांची मने; तर शेखर कपूर यांनीही भरभरून केली प्रशंसा – Tezzbuzz

‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. जरी सुरुवातीला कमाईची गती कमी असली तरी आता याला वेग आला आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वेग पकडू लागलाय तसेच प्रेक्षकांना याची कथा प्रंचड पंसतीस उतरत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 10 व्या दिवशी कमाईत वाढ नोंदवली गेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना तर आवडतच आहे. पण आता अनेक दिग्गज मंडळीना सुध्दा आवडला आहे. ज्येष्ठ बॉलीवूड दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही हा चित्रपट खूप आवडला, त्यांनी एका पोस्टद्वारे याचे कौतुक केले. तसेच, ‘मैं वापस आऊंगा’ हा अशा दुर्मिळ चित्रपटांच्या श्रेणीत सामील झाला आहे ज्यांची कमाई कालांतराने वाढते, याबद्दल त्यांनी इम्तियाज अली यांची प्रशंसा केली.

शेखर कापूर (kapoor)यांनी एक x वर पोस्ट शेअर केली आहे. त्यानी नमूद केले की,  “धन्यवाद, इम्तियाज अली. ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाद्वारे तुम्ही तो समज मोडीत काढला आहे की चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील भवितव्य पहिल्या आठवड्यातील कमाईवरून ठरते. तुम्ही हे सिद्ध केले आहे की, उत्तम कथा, तिचे प्रभावी सादरीकरण केले आहे. प्रेक्षकांच्या आवडी आणि प्रतिसाद महत्वाचा असतो.

या चित्रपटात दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, शर्वरी आणि वेदांग रैना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बिर्ला स्टुडिओज आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंट तसेच ‘विंडो सीट फिल्म्स’चे मोहित चौधरी आणि शिबाशीष सरकार यांच्या निर्मितीखाली बनलेला हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 44 कोटी रुपये आहे. अजुन हा आकडा किती वाढतो हे पाहण्यासारखे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रणबीर कपूर बनला आदर्श नवरा, आलिया भट्टच्या ‘अल्फा’ला अनोख्या पद्धतीने दिला पाठिंबा

Comments are closed.