होर्मुझच्या सामुद्रधुनीत सागरी वाहतूक पुन्हा सुरू, मात्र १० हिंदुस्थानी जहाजे अद्यापही प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आणि खनिज तेलाच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील सागरी वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी, हिंदुस्थानी ध्वज असलेली जवळपास १० व्यापारी जहाजे अद्यापही या मार्गावरून पुढे जाण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १७ जूनपासून हिंदुस्थानच्या दिशेने येणाऱ्या ११ जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गेल्या काही काळापासून या पट्ट्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सागरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. आता येथून जहाजांची ये-जा करण्यास आणि हा मार्ग ओलांडण्यास पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. वृत्तानुसार, वाहतूक सुरू झाली असली तरी, सुरक्षेच्या कारणास्तव किंवा क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत अनेक जहाजे अजूनही थांबून आहेत.

यामध्ये हिंदुस्थानच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल १० हिंदुस्थानी जहाज अद्यापही हा मार्ग सुरक्षितपणे ओलांडण्याच्या प्रतीक्षेत आहे. या जहाजांवरील खलाशी, कर्मचारी आणि मालाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून, त्यांना सुरक्षित मार्गिका उपलब्ध झाल्यानंतरच ते पुढील प्रवासाला सुरुवात करतील, अशी शक्यता आहे.

Comments are closed.