स्वयंपाकासाठी राईस की प्रेशर कुकर बेस्ट?





स्वयंपाकासाठी प्रेशर कुकर वापरावा कि राईस कुकर असा प्रश्न महिलांना पडतोच. पण खरं तर दोघांचेही वेगवेगळे फायदे आहेत. यामुळे आपण गरजेनुसार कुकरची निवड करू शकतो. त्याआधी दोन्ही कुकरचे फायदे समजून घेऊया.

राईस कुकरचे फायदे
जर तुम्हाला झटपट भात, पुलाव, बिर्याणी बनवायची असेल तर राईस कुकर हे बेस्ट पर्याय आहे. कारण यात भात लवकर शिजतो.तसेच भात करपण्याची शक्यता कमी असते आणि भात गरम राहतो. यामुळे जर तुम्ही कामावरून घरी आल्यावर जेवण बनवत असाल किंवा तुम्ही घरापासून लांब एकटे राहत असाल तर राईस कुकर तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कारण काम करणाऱ्या व्यक्तींसाठी वेळ वाचवणारा कुकर म्हणूनही बॅचलरमध्ये राईस कुकर लोकप्रिय आहे.

तोटे
पण हा कुकर इलेक्ट्रीक आहे. यामुळे लाईट नसेल तर हा कुकर वापरता येत नाही.
यात तुम्ही फक्त भात, खिचडी, पुलाव, बिर्याणीच बनवू शकता. त्यामुळे प्रेशर कुकरच्या तुलनेत राईस कुकरचा बहुपयोग करू शकत नाही.

प्रेशर कुकरचे फायदे
प्रेशर कुकर आपल्याकडे घराघरात वापरला जातो. डाळ, भात, भाज्या, कडधान्ये, मांसाहार अशा अनेक पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवता येतात.
तसेच यात एकाच वेळी डाळ, भात, शिजवता येतो. त्यामुळे स्वयंपाक जलद होतो आणि इंधनाची बचत होते.
तसेच कडधान्ये आणि कठीण पदार्थही सहज शिजतात. त्यामुळे वेळ वाचतो. शिवाय
हा कुकुर वीजेवर अवलंबून नाही त्यामुळे इलेक्ट्रीसिटी नसेल तरी काही फरक पडत नाही.

तोटे
शिट्ट्यांचे निरीक्षण करावे लागते.
जास्त शिजण्याची शक्यता असते.
नवशिक्यांना वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते.



Comments are closed.