Mysore Crime त्याच्या एकतर्फी प्रेमाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं…मॉर्फ केलेले फोटो भावी नवऱ्याला पाठवले, मुलीने आई-वडिलांसह स्वत:ला संपवलं…
म्हैसूर जिल्ह्यात एका तरुणाकडून होणाऱ्या छळामुळे आई वडिलांसह आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मुलीचे लग्न २४ जून रोजी होणार होते त्याआधी विकृत तरुणाने होणाऱ्या नवऱ्याला मुलीसोबतच मॉर्फ फोटो पाठवले. टी नरसीपुरा तालुक्यातील केंपय्याना हुंडी गावातील शिवन्ना, त्यांची पत्नी नागरत्न आणि त्यांची धाकटी मुलगी रक्षिता मृतांची नावे आहेत.
रक्षिताचे लग्न म्हैसूरच्या एका तरुणाशी होणार होते. “रक्षिताने एक सुसाईड नोट मागे ठेवली आहे. तपास सुरू आहे,” असे पोलिसांनी सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्या जोडप्याची मोठी मुलगी विवाहित असून गावातच राहते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षिताचे लग्न ठरल्यानंतर उल्लास गौडा नावाच्या एका व्यक्तीने तिच्यावर त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी उल्लास यांना त्या कुटुंबाला त्रास न देण्याचा इशारा दिला होता. म्हैसूरचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बलदंडी यांनी ‘हे एकतर्फी प्रेमाचे प्रकरण होते’ याला दुजोरा दिला. गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की, रविवारी रात्री उल्लासने रक्षिताचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या प्रियकराला पाठवले आणि आपले तिच्यासोबत संबंध असल्याचा दावा केला.
जेव्हा नवरदेवाच्या कुटुंबीयांनी रक्षिताच्या कुटुंबीयांना फोटोंबद्दल विचारले, तेव्हा अपमान आणि सामाजिक बदनामीच्या भीतीने त्या तिघांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवत असताना, उल्लासच्या अटकेची मागणी करत रहिवाशांनी आंदोलन केले. नंतर पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह म्हैसूरच्या के. आर. रुग्णालयाच्या शवागारात नेण्यात आले
Comments are closed.