पुन्हा मेस्सी मॅजिक! ऑस्ट्रियाला नमवीत अर्जेंटिना रुबाबात बाद फेरीत
‘फुटबॉलचा महानायक’ लियोनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या जादुई खेळाची झलक दाखवत फिफा वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला. मेस्सीच्या दोन गोलांच्या जोरावर अर्जेंटिनाने ऑस्ट्रियाचा 2-0 असा पराभव करत रुबाबात बाद फेरीत धडक मारली. या दोन गोलांसह मेस्सी पुरुष विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
मेस्सीची पेनल्टी हुकली
सामन्याच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाला आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. नवव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीला गोल करता आला नाही. त्याचा फटका मिस झाला अन् स्टेडियममध्ये उपस्थित हजारो अर्जेंटिना समर्थकांना मोठा धक्का बसला. मात्र महान खेळाडू अपयशातूनच पुनरागमन करतात आणि मेस्सीने तेच करून दाखवले. 38 व्या मिनिटाला उत्कृष्ट सांघिक चालीतून मिळालेल्या पासवर त्याने डाव्या पायाने अचूक फिनिश साधत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा त्याचा विश्वचषकातील 17 वा गोल ठरला आणि त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझचा (16 गोल) विक्रम मोडीत काढला.
मेस्सीचा ऐतिहासिक गोल
दुसऱया सत्रात ऑस्ट्रियाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार डेव्हिड अलाबाच्या नेतृत्वाखालील संघाने काही आक्रमणे केली, परंतु अर्जेंटिनाचा बचाव भक्कम राहिला. गोलरक्षक इमिलियनो मार्टिन्झ यानेही महत्त्वपूर्ण बचाव करत ऑस्ट्रियाला संधी दिली नाही. सामना संपण्याच्या अखेरच्या क्षणी मेस्सी पुन्हा चमकला. अतिरिक्त वेळेत झालेल्या गोंधळानंतर चेंडू त्याच्याकडे आला आणि चार बचावपटूंना चकवत त्याने चेंडू जाळ्यात धाडला. या गोलासह त्याने विश्वचषकातील एकूण 18 गोलांचा टप्पा गाठत इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव आणखी ठळक केले.
अर्जेंटिनाच्या गोलमेकरचे रेकॉर्ड्स
- ऑस्ट्रियाविरुद्ध 38 व्या मिनिटाला केलेल्या गोलने मेस्सीने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकला. नंतर त्याने अतिरिक्त वेळेत दुसरा गोल करून विश्वचषकातील एकूण गोलांची संख्या 18 वर नेली.
- सर्वाधिक वर्ल्ड कप विजय मिळणाऱया खेळाडूंच्या यादीत आता मेस्सी अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मेस्सीच्या नावावर आता 18 वर्ल्ड कप विजय झाले आहेत, तर यापूर्वी हा विक्रम जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझच्या (17) नावावर होता.
- मेस्सीने इतिहासातील सर्वात खास क्लबमध्ये स्थान मिळवले. सलग सहा वर्ल्ड कपमध्ये गोल करणाऱया खेळाडूंच्या यादीत जस्ट फॉन्टेन (फ्रान्स) जैरझिन्हो (ब्राझील), लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे तीन खेळाडू आहेत.
- केवळ दोन खेळाडूंनी पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल केले आहेत. मेस्सीने 2006, 2014, 2018, 2022 आणि 2026 च्या विश्वचषकांमध्ये गोल केले आहेत. या यादीत मेस्सीबरोबर पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश आहे.
- विश्वचषकात सर्वाधिक 28 सामने आणि सर्वाधिक मिनिटं (2492) मेस्सीच्या नावावर आहेत. सर्वाधिक 21 सामन्यांत त्याने नेतृत्व केले आहे, तर सर्वात जास्त ‘सामनावीर’ पुरस्कार (13) त्याच्याच नावावर आहेत. विश्वचषकात सर्वाधिक गोल्डन बॉल जिंकण्याचा मानही मेस्सीच्या नावावर आहे.
Comments are closed.