आर्यन, सान्वी सर्वोत्तम जलतरणपटू – TMarathiNews
कर्नाटकाला 334 गुणांसह सर्वंकष विजेतेपद
वृत्तसंस्था, अहमदाबाद
येथे नुकत्याच झालेल्या 79 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गुजरातच्या आर्यन नेहराने पुरूष विभागात तर महाराष्ट्राच्या सान्वी देशवालने महिलांच्या विभागात सर्वोत्तम जलतरणपटूचा बहुमान पटकाविला. या स्पर्धेत कर्नाटकाने 334 गुणांसह सर्वंकष विजेतेपद पटकाविले.
पुरूषांच्या विभागात गुजरातच्या आर्यन नेहराने 3 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक मिळविले तसेच त्याने 2 नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले. महिलांच्या विभागात सान्वी देशवालने 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकासह एक नवा राष्ट्रीय विक्रम केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 22 नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले असून त्यामध्ये 10 विक्रम पुरूष विभागात तर 12 विक्रम महिलांच्या विभागात झाले. सदर स्पर्धा सहा दिवस चालली होती.
Comments are closed.