भारतीय लष्कराने झोहोसोबत सामंजस्य करार केला

डिजिटल स्वदेशीकरणावर मोठा निर्णय : जेएआय अनुरुप डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सैन्यामध्ये स्वदेशी डिजिटलच्या एंट्रीवरून अत्यंत मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. सैन्याने जोहो कॉर्पोरेशनसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून यामुळे भारताच्या जॉइंटनेस, आत्मनिर्भरता आणि इनोव्हेशन मिशनच्या (जेएआय) अनुरुप स्वदेशी डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन मिळणार आहे.

भारतीय सैन्य आणि जोहो दरम्यान झालेल्या सामंजस्य करारावर लेफ्टनंट जनरल हर्ष छिब्बर आणि जोहो कॉर्पोरेशनच्या इंजिनियरिंगचे संचालक राजेंद्रन डंडापानी यांनी स्वाक्षरी केली आहे. यादरम्यान जोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक श्रीधर वेम्बू देखील उपस्थित राहिले.

भागीदारीचा उद्देश

-सैन्यात अॅप्लिकेशन-ओरिएंटेड रिसर्च आणि विकासाला प्रोत्साहन.

-सुरक्षित अन् शाश्वत डिजिटल तोडगा विकसित करणे.

-तंत्रज्ञानावर आधारित कौशल्यांना प्रभावी करणे.

-सैन्याला भविष्यासाठी तयार करणेही आहे उद्देश

-डिजिटल स्वरुपात सशक्त दलात बदलण्याची प्रक्रिया गतिमान

भारतात चर्चेत आहे कंपनी

जोहो भारतातील एक प्रमुख बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कपनी क्लाउड-आधारित बिझनेस सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन्स तयार करते. याची स्थापना 1996 साली श्रीधर वेम्बू आणि टोनी थॉमस यांनी केली होती. अलिकडेच अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये आलेल्या कटूतेनंतर गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांनी अचानक भारतातील स्वत:च्या सेव बंद केल्या तर याला  पर्याय कोण असणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. यानंतर जोहोला याच्या पर्यायाच्या रुपात पुढे करण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला होता. सरकारने देखील अनेकदा या कंपनीला प्रमोट केले होते. काही काळासाठी जोहोचे युजर्सही वाढले होते.

 

 

Comments are closed.