पहिल्याच पावसात मुंबईकरांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातून वाट, मुंबईचे हे फोटो बघाच…





मुंबई : मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईत बुधवारी (24 जून) पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 200 मिमीपेक्षा अधिक पाऊस पाडला असल्याचे समोर आले आहे. पण, या पहिल्याच पावसात मुंबईकरांची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे तसेच प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांना साचलेल्या गुडघाभर पाण्यातूनच वाट काढावी लागली. तसेच, सकाळी कामासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना लेट मार्कचा सामना करावा लागला. कारण, या पावसाचा मोठा परिणाम मुंबई लोकल वाहतूक सेवेवर झाल्याचे समोर आले. अनेक लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. याच पार्श्वभूमीवर मुंबईत साचलेल्या पाण्याचे चित्र धावणारे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.



Comments are closed.