Rashmika Mandanna Fitness : रश्मिका मंदानाच्या नॅचरल ब्युटी आणि फिटनेसचं सिक्रेट काय?
दाक्षिणात्य रश्मिका मंदानाची तरूणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. ती कधी काळी नॅशनल क्रश म्हणून ओळखली जायची. रश्मिका चाहते तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी कायमच उत्सुक असतात. आता विजय देवरकोंडासोबत लग्न झाल्यानंतर तर रश्मिका जास्तच चर्चेत आहे. रश्मिका फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिटनेस आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. वयाच्या 30 शीतही ती कमालीची फिट दिसते, पण यामागे कोणतही डाएट नसून एक शिस्तबद्ध रूटीन आहे.
रश्मिका दिवसाची सुरूवात पाणी पिऊन करते. सकाळी उठल्यावर ती सुमारे 1 लिटर पाणी पिते. यानंतर शरीर डिटॉक्स होण्यासाठी ती ऍपल सायडर व्हिनेगर घेते. हा नियम ती न चुकता दररोज पाळते.
रश्मिका नियमितपणे भात खाण्याऐवजी विविध प्रकारच्या रस्स्याच्या भाज्या एकत्र करून खाते. तीला दाक्षिणात्य जेवण फार आवडतं पण तिने डाएटिशनच्या सल्ल्यानुसार आहारात हा बदल केला आहे.
दररोजचा वर्कआऊट केल्यानंतर ती शरीर चार्ज करण्यासाठी प्रोटिनयुक्त आहारा घेते. यासाठी ती आहारात अंड्याचा समावेश करते.



हेही वाचा – समंथा रुथ प्रभु होऊनि आले
Comments are closed.