प्लेस्कूलमध्ये अडीच वर्षाच्या मुलाची वर्गमित्राला बेदम मारहाण, शरीरभर घेतले चावे; मुलगा गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बालवर्गात शिक्षणाचे धडे घेणाऱ्या एका दोन वर्षांच्या मुलाला त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने मारहाण करून चावा घेतल्याचा गंभीर प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह मदतनीसा विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिडको परिसरात असलेल्या फर्स्टक्राय इंटेलीटॉट्स प्रीस्कूलमध्ये दोन वर्षांचा मुलगा बालवाडीत शिक्षण घेतो. नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. त्याच्या वर्गातील इतर मुलेही होते. सकाळी अकरा वाजता त्याच्या वर्गात सगळे मुले असताना एका मुलाला वर्गाच्या बाहेर घेऊन मदतनीस गेल्यानंतर बाहेरून दरवाजा बंद केला. त्यानंतर तब्बल अर्धातास दरवाजा बंद होता. मात्र, यादरम्यान त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका समवयस्क मुलाने तक्रारदाराच्या मुलाला मारहाण करून अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र, या दरम्यान मदतनीस तसेच शाळेतील एकही कर्मचारी फिरकला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मुलाला झालेल्या मारहाणीस शाळेचे प्राध्यापक कांचन येवले, सीईओ शुभम महेश्वरी, विजय रेड्डी, रिजनल मॅनेजर मंगेश मुसाळे, शाळेतील मदतीनसह इतर लोक जबाबदार असल्याची तक्रारी मारहाण झालेल्या मुलाच्या वडिलांनी दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात वरील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू मुंढे करीत आहेत.

Comments are closed.