FIFA World Cup 2026 – मेस्सी, रोनाल्डोची केली बरोबरी; मेक्सिकोच्या गोलकीपरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

FIFA World Cup 2026 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मेक्सिकोविरुद्ध चेकियाविरुद्धच्या ग्रुप-ए सामन्यात मेक्सिकोचा गोलकीपर गिलेर्मो ओचोआ याने इतिहास रचला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी मैदानात उतरून गिलेर्मो ओचोआने फुटबॉल विश्वात आपली एक वेगळी छाप पडत व्यावसायिक फुटबॉलमधून निवृती जाहीर केली. सामन्याच्या 77 व्या मिनिटाला मैदानात उतरताच तो विश्वचषकात मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. ओचोआ याने वयाच्या 40 वर्षे 346 व्या दिवशी हा विक्रम आपल्या नावावर केला. यासह त्याने मेक्सिकोचे माजी कर्णधार राफा मार्केज याचा विक्रम मोडला, ज्याने 2018 च्या विश्वचषकात वयाच्या 39 वर्षे 139 व्या दिवशी हा विक्रम केला होता.

चेकियाविरुद्धच्या या सामन्यात मेक्सिकोचा मुख्य गोलकीपर लुईस एंजेल मालागॉन जखमी झाल्यानंतर ओचोआला सामन्यात खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली, ज्याचे त्याने सोने केले. या सामन्यात मैदानात उतरताच ओचोआ जगातील अशा निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाले, ज्यांनी तब्बल सहा फिफा विश्वचषक खेळले आहेत. आता या विशेष क्लबमध्ये त्यांच्यासोबत अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो यांचाही समावेश झाला आहे. ओचोआ 2006 आणि 2010 च्या विश्वचषकात बॅकअप गोलकीपर म्हणून संघात होता, तर 2014, 2018 आणि 2022 च्या विश्वचषकात त्याने मुख्य गोलकीपर म्हणून भूमिका बजावली होती. ओचोआच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या सामन्यात मेक्सिकोने चेकियाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला.

FIFA World Cup 2026- विक्रमांच्या ग्रहावरचा खिलाडी

मेक्सिकोच्या या दमदार विजयानंतर चाहत्यांचे आभार मानताना ओचोआ म्हणाले, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोक तुमचे कष्ट आणि प्रयत्न समजून घेतात. मी नेहमीच त्यांच्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी यापेक्षा चांगली निवृत्ती असूच शकत नव्हती.” ओचोआसाठी हा निरोप समारंभ अधिक भावूक आणि खास ठरला, कारण त्याचा हा शेवटचा सामना ‘एझ्टेका स्टेडियम’वर झाला. हे तेच ऐतिहासिक मैदान आहे, जिथे त्यांने 2004 मध्ये ‘क्लब अमेरिका’साठी खेळून आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Comments are closed.