थोडी जरी हिंमत आणि लाज असेल तर भाजप किंवा मिंध्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवा; आदित्य ठाकरे यांचे संजय दिना पाटील यांना आव्हान
शिंदे गटात प्रवेश केलेल्या गद्दार खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. तसेच त्यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीचा मुद्दाही गाजत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत संजय दिना पाटील यांना थएट आव्हान दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ते आता लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत, ते मिंधे प्रतिनिधी झाले आहेत. पत्रकारांना, लोकांना शिवीगाळ करताहेत, धमक्या देताहेत, दादागिरीचा आव आणत आहेत. थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्या आणि मिंधेंच्या किंवा भाजपच्या चेहऱ्यावर लढवून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. पत्रकारांना शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात. एवढीच हिंमत असेल एवढाच दम असेल तर, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांना धमकावल्याचा आणि त्यांच्याशी असभ्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत निषेध केला. ते एका जबाबदार लोकप्रतिनिधीप्रमाणे वागण्याऐवजी एखाद्या ‘गुंडा’प्रमाणे वागत आहेत. त्यांना आता जनतेचे आणि प्रसारमाध्यमांचे प्रश्न असह्य वाटू लागले आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
या घनेवरून जनतेच्या आणि पत्रकारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर संजय दिना पाटील सुरक्षेचा गैरवापर करून सामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकावणार असतील, तर सरकार त्यांना कडक सुरक्षा व्यवस्था का पुरवत आहे? तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याबाबत काय कारवाई करणार आहेत? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे दिसत आहे. मुंबई लोकलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी एका तरुणाची हत्या करण्यात आली. आता लोकप्रतिनिधी पत्रकारांना धमकावत आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री याची दखल घेणार आहेत का? असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
Comments are closed.