Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…
पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण! टीकेची झोड उठताच संजय दिना पाटील नरमले, जाहीर दिलगिरी व्यक्त
शिवसेना ठाकरे गटातून नुकताच शिवसेना शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे पत्रकारांना अरेरावीची भाषा केल्यामुळं अडचणीत सापडले आहेत. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन असे शब्द त्यांनी वापरले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. यानंतर संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे, त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असे पाटील यांनी म्हटलं आहे.
ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वन करण्यासाठी येताहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची हत्या करण्यात आलीय. सिया गोयलशी (Siya Goyal) लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न केतननं पाहिलं होतं. पण तिनंच केतनचा (Ketan Agarwal Murder Case) केसानं गळा कापलाय आणि या हत्येत सियाला साथ दिली ती, तिचा प्रियकर चेतन चौधरीनं (Chetan Chaudhary).
सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि दोन खासगी विमानं बुक करण्यात आली होती. मात्र त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सियान आणि चेतननं ठरवलं आणि लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केली. आता या प्रकरणानं संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केतनचे कुटुंबीय करत आहेत. तसेच, इतरही अनेकजण सिया गोयलला कठोरता कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी करत आहेत. पण, अशातच एका महिलेनं मात्र, सियाची बाजू घेत तिला जामीन दिला जावा, अशी मागणी केलीय. तर, केतन अग्रवालसोबत असंच व्हायला हवं होतं, असं म्हटलंय.
Comments are closed.