हेरॉईन तस्करीप्रकरणी दिल्लीतील व्यावसायिकाला अटक.
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुजरातमधील मुंद्रा बंदरातून जप्त केलेल्या अंदाजे 3,000 किलो हेरॉईनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचा रहिवासी हरप्रीत सिंग तलवार याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. 24-25 जून रोजी दिल्लीतील सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यांदरम्यान हरप्रीत सिंग याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करून रिमांडवर घेण्यात आले. तपास यंत्रणेनुसार, सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुमारे 3,000 किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आल्याप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. ऑगस्ट 2022 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने याच प्रकरणात हरप्रीत सिंग तलवार उर्फ कबीर तलवार यालाही अटक केली होती. ईडी आता या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या पैलूचा तपास करत आहे.
Comments are closed.