जाड की पातळ ? मानेच्या दुखण्यावर कोणती उशी बेस्ट
आपल्या पैकी अनेकांना सकाळी उठल्यावर मानदुखी, खांदे आखडणे , डोकेदुखी अशा समस्या जाणवतात. या समस्या कदाचित कामाचा ताणा, स्ट्रेस, लॅपटॉप, कॉम्प्युटर ,मोबाईलचा अतिवापर, यामुळे होत असाव्यात असे समजले जाते. पण या कारणांव्यतिरिक्त मानेखाली चुकीच्या उशीचा वापर हेदेखील महत्वाचे कारण आहे. कारण योग्य उशी फक्त आराम देत नाही तर मान आणि मणका यांना जोडणाऱ्या हाडांना आधारही देते. त्यामुळे आपल्याला मानदुखी, पाठदुखी सारख्या उद्धभवत नाही. यामुळे योग्य उशी कशी निवडावी ते बघूया.
मानदुखी-उशी
तज्ज्ञानुसार उशी निवडताना फक्त ती किती मऊ आहे हे पुरेस नसून तुमची झोपण्याची सवय आणि तुम्हाला असलेला शारिरीक त्रास यांचाही विचार करावा. जर उशी घेतल्यावर मान आणि मणका यात समतोल नसेल तर रात्रभर शरीरावर त्याचा ताण पडतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर मानदुखी, खांदे आखडणे, पाठ, कंबर दुखणे असा त्रास होतो.
कुशीवर झोपणारे
ज्यांना एका कुशीवर झोपण्याची सवय असते अशांनी जाड आणि मानेला आधार देणारी उशी वापरावी. तसेच कुशीवर झोपणाऱ्यांसाठी मेमोरी फोम किंवा कंटूर डिझाईनच्या उशा आरामशीर असतात.
पाठीवर झोपणाऱे
पाठीवर झोपणाऱ्यांसाठी जाड आणि पातळ या दोन्ही प्रकारच्या उशा नुकसानकारक असतात.यामुळे पाठीवर झोपण्याची सवय असलेल्यांनी मध्येम जाडीच्या उशा वापराव्यात. त्यामुळे मान, खांदे, मणका यांना आधार मिळतो. सकाळी मानदुखी, खांदेदुखीचा त्रास होत नाही.
पोटावर झोपणारे
काहींना पोटावर झोपण्याची सवय असते. अशांनी पातळ ,मऊ उशी वापरावी. जाड उशीमुळे मानेवर ताण पडतो.
यामुळे उशी निवडताना नेहमी मऊ निवडू नये. तर मानेला , खांद्याला, पाठ, मणक्याला आराम देणारी निवडावी. बाजारात मेमोरी फोम, लेटेक्स आणि इलेक्ट्रीक उशादेखील उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा.
Comments are closed.