नवलच! गरुड भरारी
>> अरुण
प्राण्यांत वाघ, भूचर पक्ष्यांत मोर तसेच उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांमध्ये गरुड सर्वात देखणा. त्याचा एकूण डौत्याची तीक्ष्ण नजर आणि आकाश पेलणारी उंचच उंच भरारी याचं कुतूहल. बालपणी पुस्तकात त्याचं चित्र पाहिल्यापासूनच असतं. त्याच्या पंखातलं उडण्याचं बळ नुसतं स्वतःपुरतं नसतं तर त्याच्या वजनाइतकाच एखादा प्राणी तो भक्ष्य म्हणून उचलून उडू शकतो. गोल्डन इगल किंवा सुवर्ण गरुड एखादं हरिणसुद्धा उचलून उंच पहाडावर नेतानाची फिल्म तुम्हीही कधी पाहिली असेल. ‘वाईल्ड लाइफ’ माहितीपटांमधून अशा ‘अॅमेझिंग’ गोष्टी दिसत असतात.
गरुडासारख्याच गिधाड किंवा ससाण्याच्या पंखांची व्याप्ती (स्पॅन) सुमारे 12 फुटांची असते. गरुडाचं वजन मात्र 10 किलो इतकंच असतं. आता शहामृगालाही पक्षीच मानलं जातं. मात्र तो उंच आकाशात उडू शकत नाही. त्याचं वजन 160 किलोपर्यंत जातं.
गरुडापेक्षा जास्त वजन असलेला पक्षी म्हणजे ‘कोरी बस्टर्ड.’ त्याचं वजन 20 किलोपर्यंत भरतं. एवढ्या वजनासह तो पंखांच्या बळावर आकाशात भरारी घेऊ शकतो, पण तसं तो क्वचितच म्हणजे अगदी जिवावर बेतलं तरच करतो. एरवी या आफ्रिकन पक्ष्याचा वावर जमिनीवरचाच. यापैकी ग्रेट बस्टर्डचं वजन 20 ते 25 किलोपर्यंत असू शकतं.
मग गरुडाला पक्ष्यांचा राजा का म्हणायचं? याची अनेक कारणं आहेत. गरुड त्याच्या परिसरातल्या पक्षी मंडळींवर राजासारखी हुकूमत गाजवतो. गरुडाची नजर इतर पक्ष्यांपेक्षा कमालीची तीक्ष्ण असते. उंच पर्वतशिखरावर बसून खालच्या दरीत कोणतं ‘भक्ष्य’ वावरतंय ते त्याला स्पष्ट दिसतं.
त्याची भरारी तर देखणी आणि दिमाखदार (एलाइट फ्लाइट) असते. तो कमालीची उंची गाठू शकतो. ज्या उंचीवर इतर पक्षी, दमछाक झाल्याने जाऊच शकत नाहीत तिथे गरुडभरारी सहज पोचते. गरुडाच्या पंखातलं, फुप्फुसातलं हे बळ जसं मोठं तशीच त्याच्या पंजातली पकडीची ताकदही फार असते. पूर्ण वाच्या हरिणासारखा प्राणी उचलून उंच शिखरावर नेऊन ठेवणं तो सहजतेने करतो. यामुळेच या पक्ष्याला ‘राजा’चा मान मिळाला. अनेक संस्कृतींच्या राजचिन्हांमध्ये त्याला मानाचं स्थान मिळालं. त्याच्या भरारीच्या कौतुकाचं मूर्त स्वरूप म्हणजे अनेक टन वजन घेणाऱया कृत्रिम पंखांचं बळ लाभलेल्या विमानांच्या उड्डाणालाही त्याची उपमा दिली जाते. इंडोनेशियाची विमानं ‘गरुडा एअरलाइन्स’ म्हणूनच उडतात! आपल्या देशात गरुड पक्षी सर्वत्र आअपवाद फक्त राजस्थान आणि ओरिसा, तेलंगणाचा.
Comments are closed.